Namibia cheetah India : नामिबियामधून 8 चित्ते भारतात दाखल, चित्त्यांना घेऊन विमान ग्वाल्हेरमध्ये पोहोचलं!

| Updated on: Sep 17, 2022 | 8:34 AM

सकाळी पावणे अकरा वाजता चित्त्यांना अभयारण्यात सोडलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (PM Narendra Modi) यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, याआधी ग्वाल्हेरऐवजी जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आला

Follow us on

नवी दिल्ली : नामिबियामधून (Namibia) 8 चित्ते भारतात दाखल झालेत. चित्त्यांना घेऊन विमान ग्वाल्हेरमध्ये पोहोचलं असून आता चित्त्यांचा पुढचा प्रवास हेलिकॉप्टरने होणार आहे. ग्वाल्हेरमधून हेलिकॉप्टरने चित्त्यांना (Namibia cheetah India) कुनो नॅशनल पार्कमध्ये नेण्यात येणार आहे. आज सकाळी पावणे अकरा वाजता चित्त्यांना अभयारण्यात सोडलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील (PM Narendra Modi) यावेळी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, याआधी ग्वाल्हेरऐवजी जयपूरमध्ये विमानाचं लँडिंग होणार होतं. मात्र तांत्रिक कारणांमुळे बदल करण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून नामिबियातून भारतात येत असलेल्या चित्त्यांवर चर्चांना उधाण आलंय. बोईंग 747 या विशेष विमानाने आठही चित्त्यांना नामिबियातून भारतात आणण्यात आलं आहे. मध्य प्रदेशातील कुनो अभयारण्यात या चित्त्यांसाठी खास काळजी घेण्यातही येणार आहे.