Eknath Khadse | माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं? : एकनाथ खडसे

Eknath Khadse | माझ्यापुढे शेपटी हलवणारे मला विचारतात 30 वर्षात तुम्ही काय केलं? : एकनाथ खडसे

| Edited By: | Updated on: Dec 20, 2021 | 12:15 PM

भाऊ गुलाबराव तुमच्या तालुक्यात अंजली धरण मी बांधला हो तरी विचारता तीस वर्षात तुम्ही काय केलं. एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन व पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना बोदवड नगरपंचायत प्रचार जोरदार टीका केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांना उत्तर दिलं आहे.  नाथाभाऊंच्या जीवावर मोठे झाले, कोण कुठे होतं माझ्यापुढे शेपटी हलवणारे मागेपुढे फिरणारे आणि तेच आता मला विचारतात तीस वर्षात तुम्ही काय केलं? टपरीवर फिरणाऱ्याला मी मंत्री बनवलं, पक्षाचा आशीर्वाद असला तरी माझ्या शब्दाला मान होता. आता मेरी बिल्ली मेरे को म्याऊ शेर शेर होता है .पारधी पासून ते धरणगाव रस्ता मी केला जामनेर मतदार संघात सर्व धरणाचे काम कोणी केलं. भाऊ गुलाबराव तुमच्या तालुक्यात अंजली धरण मी बांधला हो तरी विचारता तीस वर्षात तुम्ही काय केलं. एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन व पालक मंत्री गुलाबराव पाटील यांना बोदवड नगरपंचायत प्रचार जोरदार टीका केली.