Eknath Shinde : पहलगामच्या हल्ल्यात आदिल शाहाचा मृत्यू, एकनाथ शिंदे कुटुंबाच्या मदतीला धावले, एका झटक्यात मोठा निर्णय!

Eknath Shinde : पहलगामच्या हल्ल्यात आदिल शाहाचा मृत्यू, एकनाथ शिंदे कुटुंबाच्या मदतीला धावले, एका झटक्यात मोठा निर्णय!

| Updated on: Apr 25, 2025 | 5:16 PM

पहलगाम येथे झालेल्या गोळीबाराच्या हल्ल्यात पर्यटकांना वाचवताना आदिल हुसैन शाह याचा मृत्यू झाला. यानंतर आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबियांना एकनाथ शिंदे घर बांधून देणार असल्याचा निर्णय जाहीर केला.

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यादरम्यान अतिरेक्यांकडून बंदूक हिसकावणाऱ्या आदिल हुसैन शाह यांची देखील दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. अतिरेक्यांकडून बंदूक हिसकावणारा आदिल हुसैन शाह हा पर्यटकांना बैसरन येथे खच्चरवरून न्यायचं काम करायचा. मंगळवारी बैसरन येथे दशहतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला आदिल हुसैन शाह याने विरोध केला मात्र त्याला देखील दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार मारलं. या घटनेनंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज आदिलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. त्याच्या कुटुंबाचं सांत्वन केल्याचे पाहायला मिळाले. अशातच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदिल हुसैन शाहाच्या कुटुंबातील सदस्यांशी फोनवरून संवाद साधला, तसेच त्याच्या कुटुंबाला घर बांधून देण्याचं आश्वासन देखील दिलं. आदिल हुसैन शाह हा त्याच्या कुटुंबात कमावणारा एकमेव व्यक्ती होता. दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याने घरातील आधार गेल्याची भावना आदिल हुसैन शाह याच्या कुटुंबाने व्यक्त केली होती. दरम्यान, आदिल हुसैन याच्या कुटुंबाकरता एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Published on: Apr 25, 2025 05:16 PM