VIDEO : Deepak Kesarkar |’एकनाथ शिंदेंचं नेतेपद काढलं, सेनेला रितसर नोटीस पाठवू शकतो’

| Updated on: Jul 02, 2022 | 1:55 PM

बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील खासदार उपस्थित होते. यावेळी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरूनही हटवण्यात आले आहे. आता यावर सेनेला रितसर नोटीस पाठवू शकतो असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. यामुळेच राज्याचे राजकारण अजून पुढील काही दिवस तापन्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 

Follow us on

एकनाथ शिंदे यांच्या बंडाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. या बंडाने ठाकरे सरकारला पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांनाही नव्हती. मात्र फडणवीसांनी याठिकाणीही सर्वांना धक्का देत एकनाथ शिंदे यांचं नावं हे थेट मुख्यमंत्रिपदासाठी घोषित केलं. या नव्या सरकारच्या स्थापनेनंतर मोतश्रीवरही एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेतील खासदार उपस्थित होते. यावेळी शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांना नेतेपदावरूनही हटवण्यात आले आहे. आता यावर सेनेला रितसर नोटीस पाठवू शकतो असा दावा दीपक केसरकर यांनी केला आहे. यामुळेच राज्याचे राजकारण अजून पुढील काही दिवस तापन्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.