Eknath Shinde : बिहारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री अन् शिंदेंची ताबडतोब दिल्लीवारी, मोठ्या गाठीभेटी होणार; दौऱ्यात काय घडणार?
राज्य नेतृत्वाकडून युतीधर्माचे पालन होत नसल्याच्या मुद्द्यावर तसेच राज्यातील राजकीय गोंधळावर दिल्लीत शिंदेंकडून चर्चा अपेक्षित आहे. तर दुसरीकडे मुंबईतील पोलीस दलाच्या एका कार्यक्रमाला शिंदे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली, जिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.
बिहारमध्ये नितीश कुमार उद्या दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. एनडीए विधिमंडळ नेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री असतील. दुसरीकडे, महाराष्ट्राच्या राजकारणातही वेगवान घडामोडी सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले असून, ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले असून, ते वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. राज्य नेतृत्वाकडून युतीधर्माचे पालन होत नाही, यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
Published on: Nov 19, 2025 05:14 PM
