ShivSena Vardhapan Din : ‘मुंबईत ठाकरेच… भगवा शिवराय अन् बाळासाहेबांचा’, शिवसेना वर्धापन दिनी दोन्ही शिवसेनेची बॅनरबाजी

ShivSena Vardhapan Din : ‘मुंबईत ठाकरेच… भगवा शिवराय अन् बाळासाहेबांचा’, शिवसेना वर्धापन दिनी दोन्ही शिवसेनेची बॅनरबाजी

| Updated on: Jun 19, 2025 | 9:31 AM

आज शिवसेनेचा वर्धापन दिन असल्याने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुंबईत चांगलेच बॅनर लावण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन वरळीडोम तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे षण्मुखानंद येथे पार पडणार आहे.

आज शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळी डोम येथे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे षण्मुखानंद येथे साजरा करण्यात येणार आहे. आजच्या वर्धापन दिनी एकनाथ शिंदे मुंबई महापालिका निवडणुकीवर बोलण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरे मनसेसोबतच्या युतीची घोषणा करणार का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

आजच्या मेळाव्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून एक टीझर प्रदर्शित करण्यात आला असून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे यांच्याकडून मुंबईत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुंबईत ठाकरेच… असं ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनर झळकवण्यात आले तर भगवा शिवरायांचा आणि बाळासाहेबांचा असे शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे.

Published on: Jun 19, 2025 09:29 AM