Sanjay Gaikwad : आधी काढला बाप अन् आता यु-टर्न, संजय गायकवाडांच्या ‘त्या’ वक्तव्यानं चर्चांना उधाण
संजय गायकवाड यांनी केलेल्या कालच्या वक्तव्यानंतर आज टीका होत असताना स्पष्टीकरण देत यु-टर्न घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. बघा कालचं आणि आजचं वक्तव्य
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने काल राज्यभरात महायुतीतील भ्रष्ट मंत्र्यांविरोधात राज्यभर आंदोलन केलं, शिवसेना उद्धव ठाकरे गटाने केलेल्या आंदोलनावर बोलताना आमदार संजय गायकवाड यांनी माझी कॉपी कुणीही करू शकत नाही मी ओरिजनल आहे, असे म्हटले होते. तसेच ‘उबाठाचा बापही माझी कॉपी करू शकत नाही’ असे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, आज त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतल्याचे दिसते. मात्र, आज त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू-टर्न घेतल्याचे दिसते. संजय गायकवाड यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, त्यांचे वक्तव्य हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसंदर्भात होते, पण त्यांच्या शब्दांचा विपर्यास करण्यात आला. बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे दैवत आणि बाप आहेत, असे म्हणत त्यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्यावरून माघार घेतल्याचे दिसत आहे.
Published on: Aug 12, 2025 03:12 PM
