‘गंगाजल शुद्धच पण…’, शिंदेंच्या शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचलं

‘गंगाजल शुद्धच पण…’, शिंदेंच्या शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचलं

| Updated on: Apr 02, 2025 | 2:16 PM

'हा क्षण अभिमानाचा, हा क्षण गौरवाचा हा क्षण हिंदू एक जुटीचा... हर हर गंगे... नमामि गंगे', असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनसेला डिवचण्यात आलंय.

‘गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय?’, असा सवाल करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गंगाजल शुद्धच आहे, असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळालं. यानंतर कोणताही वाद निर्माण होऊ नये आणि तणावाचं वातावरण होऊ नये म्हणून पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त शिवसेना भवन परिसरात पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनासमोर ही बॅनरबाजी करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. शिवसेनेचे नेते सदा सरवणकर यांच्याकडून एकनाथ शिंदे यांचा फोटो असलेला बॅनर लावण्यात आला आहे. दरम्यान, शिवसेनेकडून करण्यात आलेल्या या बॅनरबाजीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून असे बॅनर लावणारे बालिश बुद्धीचे लोकं आहेत, असं म्हणत मनसेकडून सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. दरम्यान, या वादानंतर मनसे कार्यकर्त्यांसह मुंबई महाालिकेकडून शिवसेनेचं भलं मोठं बॅनर खाली उतरवण्यात आलं आहे.

Published on: Apr 02, 2025 01:25 PM