शिवसेने अंतर्गत निवडणुकीचा मार्ग मोकळा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हालचाली वाढल्या

शिवसेने अंतर्गत निवडणुकीचा मार्ग मोकळा, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हालचाली वाढल्या

| Updated on: Feb 19, 2023 | 11:15 PM

VIDEO | एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित करणार, पक्षांतर्गत निवडणुकीसाठी नेत्यांची चाचपणी सुरू

दिनेश दुखंडे, मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित करणार असून यामुळे शिवसेने अंतर्गत निवडणुकीचा मार्ग मोकळा होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यविधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील हालचाली वाढल्या आहेत. इतकेच नाही तर पक्षांतर्गत निवडणुकीसाठी नेत्यांची चाचपणी सुरू केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालानुसार राजकीय पक्ष शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे बहाल करण्यात आले आहे. २३ जानेवारी रोजी राष्ट्रीय कार्यकारणी आयोजित करण्यासाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती मात्र त्यावेळी निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू होती. त्यामुळे कोणताही निर्णय दिला नव्हता मात्र आता निवडणूक आयोगाने निर्णय दिल्यावर शिवसेने अंतर्गत निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

Published on: Feb 19, 2023 11:13 PM