Santosh Bangar :  मतदानाची थट्टा, महाराष्ट्रात हे काय चाललंय? मतदान केंद्रात घुसून बांगरांचा महिला मतदारावर दबाव, बघा VIDEO

Santosh Bangar : मतदानाची थट्टा, महाराष्ट्रात हे काय चाललंय? मतदान केंद्रात घुसून बांगरांचा महिला मतदारावर दबाव, बघा VIDEO

| Updated on: Dec 02, 2025 | 9:23 PM

शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात महिलेवर दबाव आणून मोबाईलवर व्हिडिओ काढल्याने गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या मतदान केंद्रातील कृतीमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एका महिलेला मतदान करताना विशिष्ट बटणे दाबण्यास सांगून आणि मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्ड करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये बांगर मतदाराला सूचना देताना आणि “तिन्ही बटणं दाबायची,” “बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो,” तसेच “एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देताना दिसत आहेत.

या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड बाळगावी, असे मत व्यक्त केले. शिंदेंच्या शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनीही आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन केले. आदित्य ठाकरे यांनी बांगर यांच्या कृत्यावर टीका करत “निवडणूक आयोग आहे की सर्कस?” असा सवाल उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.

Published on: Dec 02, 2025 09:23 PM