ठाण्यात मोठा ट्विस्ट… आधी मागे पडले, नंतर अचानक… कोण ठरलं खरा ठाणेदार?

ठाण्यात मोठा ट्विस्ट… आधी मागे पडले, नंतर अचानक… कोण ठरलं खरा ठाणेदार?

| Updated on: Jan 17, 2026 | 10:51 AM

एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे.  महानगरपालिकेत शिवसेनेने तब्बल 71 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपनेही दमदार कामगिरी करत 28 जागा मिळवल्या आहेत.

काल महानगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला असून राज्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी महायुतीने विजय मिळवला आहे. मात्र एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाणे शहरात शिंदे गटाच्या शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे.  महानगरपालिकेत शिवसेनेने तब्बल 71 जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेनेच्या पाठोपाठ भाजपनेही दमदार कामगिरी करत 28 जागा मिळवल्या आहेत.

या निकालामुळे ठाण्यात महायुतीची पकड अधिक मजबूत झाली आहे. निवडणूक निकालानंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ठाणेकरांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला असून हा विजय म्हणजे जनतेने दिलेला स्पष्ट कौल आहे.

आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, हे या निकालातून सिद्ध झाले आहे, असे सांगत शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधकांकडून केवळ आरोप केले जातात, मात्र आम्ही विकासाची कामे प्रत्यक्षात करून दाखवतो, असेही ते म्हणाले. या विजयामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत असून ठाण्यात विविध ठिकाणी जल्लोष करण्यात आला.

Published on: Jan 17, 2026 10:51 AM