Rahul Gandhi : नव्या बाटलीत जुनी दारू, राहुल गांधींच्या ‘त्या’ गंभीर आरोपांवर निवडणूक आयोगाचा पटलवार, थेट म्हटलं..
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या पत्रकार परिषदेला "नव्या बाटलीत जुनी दारू" असे संबोधले आहे. आयोगाने मतदार यादीतील अनियमिततेचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे आणि लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने आता उत्तर दिलंय. राहुल गांधींची पत्रकार परिषद म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू अशी टीका निवडणूक आयोगाने केलीये. लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं देखील निवडणूक आयोगाने म्हटलंय. 2018 मध्ये कमलनाथ यांनीही तेच गाणं गायलं, आज लोकसभेतील विरोधी पक्षनेतेही तेच गाणं गातायत. मतदार यादीत अनियमितता असल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. आदित्य श्रीवास्तव यांचं नाव तीन वेगवेगळ्या राज्यांमध्ये असल्याचा आरोप होता, काही महिन्यापूर्वी दुरुस्ती झाली. कायदेशीर प्रक्रिया करण्याऐवजी खळबळजनक दावा करण्याचा प्रयत्न केला गेला. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांवरून माफी मागावी,असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
Published on: Aug 09, 2025 12:20 PM
