Breaking | भारताच्या अध्यक्षतेखाली UNSC ची तातडीची बैठक

| Updated on: Aug 16, 2021 | 8:30 PM

एस्टोनिया आणि नॉर्वेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सोमवारी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.

Follow us on

YouTube video player

 काबूल : तालिबान लवकरचं अफगाणिस्तानचं नाव बदलून ‘इस्लामिक अमिरात ऑफ अफगाणिस्तान’ ठेवू शकतं. तालिबान समर्थकांनी रविवारी सकाळी काबूलवर हल्ला केल्यानंतर राष्ट्रपती अशरफ घनी यांनी देश सोडला. याशिवाय उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांनीही अफगाणिस्तान सोडले आहे. त्याचबरोबर देशवासी आणि परदेशी लोकही युद्धग्रस्त देशातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. अफगाण सैन्याशी अनेक महिन्यांच्या लढाईनंतर तालिबानने आश्चर्यकारकपणे एका आठवड्यात जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले. एस्टोनिया आणि नॉर्वेच्या विनंतीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) सोमवारी अफगाणिस्तानच्या परिस्थितीवर तातडीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. भारताच्या भूमिकेकडं लक्ष लागलं आहे.