राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री Nitin Raut यांची मोठी घोषणा

| Updated on: Mar 01, 2022 | 7:49 PM

उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र कृषिपंप ग्राहकांना दिलासा नाहीच. 

Follow us on
YouTube video player
बुलढाणा : राज्यातील वीज ग्राहकांसाठी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. एक-रकमी थकबाकी भरल्यास सर्व वीज ग्राहकांना व्याज व विलंब शुल्क माफ करण्यात येणार आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या नावाने नवी योजना जाहीर करण्यात आली. विलासराव देशमुख अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. सोबतच उच्चदाब वीज ग्राहकांना एकरकमी वीज बिल भरल्यास 5 टक्के रकम माफ होणार आहे. तसेच लघुदाब वीज ग्राहकांनी एकरकमी वीज बिल भरल्यास 10 टक्के रकम माफ होणार. मात्र कृषिपंप ग्राहकांना दिलासा नाहीच. जागतिक पर्यटन केंद्र लोणार येथून ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांची राज्यातील वीज ग्राहकांसाठी मोठी घोषणा.