EPFO New Rule : नोकरदारांना मोठा दिलासा… PF काढायचाय? आता नो टेन्शन, EPFO चा नवा नियम काय? लगेच जाणून घ्या…
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आता नोकरदारांना पीएफचे पैसे काढण्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही.
कामगार वर्गासाठी एक महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) पीएफ खात्यातून पैसे काढण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. यापुढे नोकरदारांना त्यांचे पीएफचे पैसे काढण्यासाठी विविध कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही, ज्यामुळे ही प्रक्रिया अधिक सोपी होणार आहे.
पीएफचे पैसे काढण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये शिथिलता आणण्यात आली आहे. हा निर्णय केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे पीएफधारकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पीएफमधील निधी जलद आणि कमी किचकट पद्धतीने उपलब्ध होईल.
EPFO च्या या पावलामुळे लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. आता त्यांना कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी करावी लागणारी धावपळ थांबणार असून, पीएफ काढण्याची प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येईल. यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीच्या काळात तात्काळ मदत मिळू शकेल. या सुधारणांमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा आहे.
