कसाबच्या वेळीही मुंबईत एवढा बंदोबस्त नव्हता – आदित्य ठाकरे

| Updated on: Jul 03, 2022 | 11:20 AM

मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल.

Follow us on

मुंबई: बाहेर कडेकोट बंदोबस्त आहे. आता तुमच्यात आणि आमच्यातही दोरी लावली आहे. कधी आमदार (MLA) आणि मीडियात दोरी लावलेली नव्हती. आता तुम्ही त्यांना गुवाहाटीला पळून नेणार आहात की आणखी काय करणार आहात? त्याला आम्ही काय करणार? कोण तेच पळून जाणार? एवढी भीती कशाला. सरकारचा एवढा बंदोबस्त असताना आणि विधानभवनाच्या परिसरात एवढा कडेकोट बंदोबस्त असताना एवढा बंदोबस्त का? कसाबच्या वेळीही मुंबईत (Mumbai) एवढा बंदोबस्त पाहिला नव्हता, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मला वाईट एवढंच वाटतं की त्यांना बसमधून आणलं गेलं. मला वाटत नाही की कधीही असं कोणत्याही अतिरेक्यांना एवढा बंदोबस्त लावून आणलं असेल. कसाबलाही आणलं नसेल. कशासाठी एवढा बंदोबस्त? कोण पळणार आहे की कोण काय करणार आहे? असा सवाल आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) यांनी म्हटलं आहे.