Raj Thackeray : …तेव्हा तर अजितदादा तावा-तावानं बोलायचे! 5 वर्षांपूर्वीचा विषय छेडत राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं

Raj Thackeray : …तेव्हा तर अजितदादा तावा-तावानं बोलायचे! 5 वर्षांपूर्वीचा विषय छेडत राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलं

| Updated on: Oct 15, 2025 | 10:48 PM

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी अजित पवारांना त्यांची सहा वर्षांपूर्वीची भूमिका आठवून दिली. त्यावेळी अजित पवारही ईव्हीएमविरोधात बोलत होते. आताही मुद्दे तेच असल्याने अजित पवारांनी आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत यायला हवे होते, असा उपरोधिक चिमटा राज ठाकरेंनी काढला. निवडणुका मतपत्रिकेवर व्हाव्यात अशी जनतेची मागणी असल्याचेही ते म्हणाले.

ईव्हीएम आणि मतदान प्रक्रियेच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना त्यांच्या जुन्या भूमिकेची आठवण करून दिली आहे. सध्या विरोधकांनी ईव्हीएमविरोधात जी बैठक घेतली, तशाच एका बैठकीत कधीकाळी अजित पवारही सहभागी झाले होते, असे राज ठाकरे यांनी उपरोधिकपणे नमूद केले.

२०१९ च्या निवडणुकांच्या तोंडावर राज ठाकरेंच्या नेतृत्वात अनेक विरोधी नेत्यांनी ईव्हीएमबद्दल संशय व्यक्त केला होता. त्यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी पत्रकार परिषदा घेऊन गंभीर आरोप केले होते. आताही ईव्हीएमचे मुद्दे तेच असल्याने अजित पवारांनी सध्याच्या विरोधी पक्षांच्या पत्रकार परिषदेत यायला हरकत नाही, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणुका मतपत्रिकेवरच घ्याव्यात, ही राजकीय पक्षांची नव्हे, तर जनतेची मागणी असल्याचेही त्यांनी सांगितले.

Published on: Oct 15, 2025 10:48 PM