छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 मतदान केंद्रांवर होणार मतदान

छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी पूर्ण; 1267 मतदान केंद्रांवर होणार मतदान

भीमराव गवळी | Updated on: Jan 14, 2026 | 5:51 PM

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर 115 नगरसेवक पदाच्या निवडीसाठी उद्या (15/01/2026) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून EVM मशीन आणि मतदानासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप सुरु आहे. 1267 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर 115 नगरसेवक पदाच्या निवडीसाठी उद्या (15/01/2026) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून EVM मशीन आणि मतदानासाठी लागणारे सर्व साहित्याचे वाटप सुरु आहे. 1267 मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील निवडणुकीसाठी कडक असा पोलीस बंदोबस्त उभारण्यात येणार आहे, त्याचबरोबर प्रत्येक मतदान कक्षावर CCTV कॅमेरा बसवण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी म्हणून 3307 पोलीस अधिकारी आणि 1928 होमगार्डचा बंदोबस्त पहायला मिळणार आहे.

Published on: Jan 14, 2026 05:51 PM