Ulhasnagar Election: उल्हासनगर पालिकेत महायुतीकडून सगे-सोयरे निवडणुकीच्या मैदानात, भाजप-सेनेकडून 4 कुटुंबातील 12 जण रिंगणात
उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने कुटुंबातील सदस्यांना संधी दिली आहे. चार कुटुंबांमधून एकूण १२ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. यात धनंजय बोराडे, वसुधा बोराडे, शीतल बोराडे, अमर लुंड, कांचन लुंड, युवराज पाटील, मीनाक्षी पाटील, राजेंद्रसिंह भुल्लर, चरणजित कौर भुल्लर आणि विक्की भुल्लर यांचा समावेश आहे.
उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत महायुतीमधील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी दिली आहे. चार कुटुंबांमधून एकूण १२ सदस्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून धनंजय बोराडे, त्यांची पत्नी वसुधा बोराडे आणि वहिनी शीतल बोराडे यांना तिकीट मिळाले आहे. तसेच, शेरी लुंड यांचा भाऊ अमर लुंड आणि वहिनी कांचन लुंड यांनाही संधी देण्यात आली आहे. तर विजय पाटील यांचा मुलगा युवराज पाटील आणि वहिनी मीनाक्षी पाटील हे शिंदे यांच्या शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. राजेंद्रसिंह भुल्लर, त्यांची पत्नी चरणजित कौर भुल्लर आणि मुलगा विक्की भुल्लर हेदेखील या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. यामुळे उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत कौटुंबिक राजकारण महत्त्वाचे ठरत आहे.
Published on: Jan 01, 2026 03:21 PM
