Rohit Pawar : आम्हाला 1500 नको.. आमच्या घरात… रोहित पवारांपुढं शेतकऱ्याच्या मुलीच्या डोळ्यात पाणी

Rohit Pawar : आम्हाला 1500 नको.. आमच्या घरात… रोहित पवारांपुढं शेतकऱ्याच्या मुलीच्या डोळ्यात पाणी

| Updated on: Jul 30, 2025 | 9:59 AM

रोहित पवारांकडे मुलीने शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्याचा एक व्हिडीओ समोर आलाय. यावेळी ही मुलगी भावूक देखील झाली. रोहित पवारांनी मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला शांत केले तर रोहित पवारांनी या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

आमदार रोहित पवार हे बुलढाण्यातील भरोसा येथील आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे कुटुंबाला सांत्वनापर भेटीसाठी आले असताना रोहित पवार परत जाताना तीन चार मुलींनी त्यांना रस्त्यात अडविले आणि संवाद केला. आमदार रोहित पवार यांच्यासमोर इयत्ता ८ वीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या मुलीने शेतकऱ्याच्या समस्या मांडल्या.

शेतकऱ्यांचा जीव गेल्यावर सरकारला जाग येत का? असा सवाल करत शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळावा, अशी मागणी या मुलीने रोहित पवार यांच्याकडे केली. ‘शेतकऱ्याच्या घरात तेल असते तर मीठ नसते, मीठ असते तर तेल नसते , सोयाबीनला भाव तीन चार हजार रुपये आणि तेलाचे भाव ११५ रूपये, शेतकऱ्यांना काय पुरते.. आम्हाला लाडकी बहिणचे १५०० रूपये नाही दिले तरी चालतील पण शेतीच्या मालाला भाव द्या, अशाप्रकारे या मुलीने रोहित पवारांपुढे प्रश्नाचा पाढा वाचला अन् व्यक्त होत असताना ही मुलगी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान, भावूक झालेल्या मुलीच्या डोक्यावर हात फिरवत रोहित पवारांनी तिला शांत केले.. इतकंच नाहीतर मी आज विरोधी पक्षात आहे, जर मी हा निर्णय घेतला असता तर आज मी मंत्री झालो असतो असे रोहित पवार म्हणाले. यावेळी त्या मुलीचा आक्रमकपणा पाहून रोहित पवारांनी तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली.

Published on: Jul 30, 2025 09:59 AM