रात्रीअपरात्री शेतातून येतो कुत्र्यांचा आणि माणसाचा आवाज… शेतकऱ्यांची शक्कल, यंत्रातून दहशत निर्माण
पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून खरिपातील पिकांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवलीआहे. शेतकऱ्यांनी शेतात कुत्र्याच्या तसेच माणसाच्या आवाजाची सौर ऊर्जेवरील यंत्रे लावली आहेत.
पुण्याच्या भोर तालुक्यातील विसगाव खोऱ्यात वन्य प्राण्यांच्या हैदोसापासून खरिपातील पिकांचे नुकसान रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अनोखी शक्कल लढवलीआहे. शेतकऱ्यांनी शेतात कुत्र्याच्या तसेच माणसाच्या आवाजाची सौर ऊर्जेवरील यंत्रे लावली आहेत. भोंग्यासारख्या या यंत्रांमधून रात्रभर कुत्री भुंकण्याचा आणि माणसे ओरडण्याचा आवाज येत असल्यानं रानडुकरांसह वन्यप्राणी घाबरून शेतापासून दूर राहत आहेत. खरिपातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी ही युक्ती आजमावली आहे. गेल्या काही दिवसांपासून विसगाव खोऱ्यात, भेकर, रानडुक्कर, मोर यांसारखे वन्यप्राण्यांकडून शेतामधल्या पिकांची नासधूस सुरू आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास कळपाने शेतात येऊन रानडुक्करं आणि वन्यप्राणी धुडगूस घालत आहेत. हाता – तोंडाशी आलेल पीक डोळ्यासमोर आडवं झाल्याने शेतकरी चिंतेतयत..नासधुसीत पीक उद्ध्वस्त होऊन, पीक वाया जात असल्याने आर्थिक नुकसानीने शेतकरी हताश होत आहे. त्यामुळं शेतातली पिक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना असे विविध उपाय करावे लागत आहे. या लावलेल्या यंत्रामुळं शेतकरी काही प्रमाणात त्यांचं शेतांचं संरक्षण करण्यात यशस्वी ठरत आहेत. असे असले तरीही वनविभागाने यामध्ये लक्ष घालून यावर ठोस उपाय योजना कराव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
