Shaktpeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र; 1 जुलैला शेतकरी रस्त्यावर उतरणार
नागपूर - गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी आता कंबर कसली आहे.
नागपूर – गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली आहे. शेतकऱ्यांवर लादण्यात येतं असलेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधात, कृषी दिनाच्या दिवशी 1 जुलैला रस्त्यावर उतरण्याचा निर्णय आज बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शक्तीपीठ विरोधात 1 जुलैला सर्व 12 जिल्ह्यांमध्ये महामार्ग रोखून चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते झाला आहे. या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक संपन्न झाली. तर राज्य सरकारने दडपशाही करू नये. पोलिसांनी यामध्ये हस्तक्षेप करू नये, असे आवाहन या बैठकीच्या निमित्ताने विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी केले आहे. दरम्यान, शक्तीपीठ महामार्गासाठी नुकतीच राज्य सरकारने वीस हजार कोटींची तरतूद केली आहे. भूसंपादनाची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं, शेतकऱ्यांचा उद्रेक झाला आहे.
