बाप म्हणावं की हैवाण… वाद पती-पत्नीचा पण संताप अनावर झाल्यानं पोटच्या चिमुकलीला जमिनीवर आपटलं अन्…

बाप म्हणावं की हैवाण… वाद पती-पत्नीचा पण संताप अनावर झाल्यानं पोटच्या चिमुकलीला जमिनीवर आपटलं अन्…

| Updated on: Feb 17, 2025 | 4:26 PM

कुर्ल्यात पती-पत्नीच्या वादात चार वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. पत्नी सोबत झालेल्या वादानंतर संतप्त पित्याने आपल्या पोटच्या मुलीलाच जमिनीवर आपटल्याचा संतापजनक प्रकार पाहायला मिळालाय.

मुंबईतील कुर्ला परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कुर्ल्यात पती-पत्नीच्या वादात चार वर्षीय चिमुकलीची हत्या करण्यात आली आहे. पत्नी सोबत झालेल्या वादानंतर संतप्त पित्याने आपल्या पोटच्या मुलीलाच जमिनीवर आपटल्याचा संतापजनक प्रकार पाहायला मिळालाय. घटनेनंतर या चिमुकलीला भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. आरोपी परवेज सिध्दीकी विनोबा भावे नगर पोलिसांच्या ताब्यात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी परवेज सिद्धीकी याचा पत्नी सबा यांच्यासोबत जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने राग अनावर झालेल्या परवेजने पत्नी सबाला जबर मारहाण केली होती. त्याच संतापाच्या भरात त्याने चार वर्षीय मुलगी आफिया हिला जमिनीवर आपटले. यामध्ये मुलगी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी भाभा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

Published on: Feb 17, 2025 04:26 PM