उद्धव ठाकरे यांच्या धनुष्यबाण आणि शिवसेना नावाचं काय होणार? अंतिम निर्णय कधी?

| Updated on: Jan 24, 2023 | 11:20 AM

केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावाबाबतचा अंतिम निर्णय 'या' दिवशी देणार

Follow us on

निवडणूक आयोगासमोर धनुष्यबाण चिन्हाबाबत आतापर्यंत तीन वेळा सुनावणी पार पडली. दरम्यान, केंद्रीय आयोगाकडून दोन्ही गटांना लेखी उत्तर द्या असा आदेश देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाकडून कोणतंही उत्तर देण्यात येणार नाही. मात्र ३० जानेवारीपूर्वी शिंदे गटाकडून लेखी उत्तर सादर केले जाऊ शकते.

धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबतचा अंतिम निर्णय येत्या ३० जानेवारी रोजी होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणूक आयोग धनुष्यबाण चिन्हाबाबतचा अंतिम निर्णय देणार आहे. तर ३० जानेवारी रोजी ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटाकडून कोणताही युक्तीवाद होणार नसल्याचेही सांगितले जात आहे. तर ३० जानेवारीपर्यंत केवळ शिंदे गटच लेखी उत्तर सादर करणार आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाबाबतची अंतिम सुनावणी ३० जानेवारी रोजी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.