Pigeon Feeding Ban : मोठी बातमी… कबुतरांना दाणे, खाद्य घातलाय? महागात पडणार; मुंबईत पहिला गुन्हा दाखल

Pigeon Feeding Ban : मोठी बातमी… कबुतरांना दाणे, खाद्य घातलाय? महागात पडणार; मुंबईत पहिला गुन्हा दाखल

| Updated on: Aug 02, 2025 | 12:23 PM

मुंबईतून एक मोठी बातमी समोर येतेय. कबुतरांना खायला घातल्याप्रकरणी मुंबईत पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय. माहिमच्या एल जे रोडवर कबुतरांना खाद्य देणं एका अनोळखी इसमाला चांगलंच महागात पडलंय.

मुंबईत सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणं आता तुम्हाला देखील महागात पडू शकते. कारण मुंबई उच्च न्यायालयाने कबुतरांना खायला घालण्यास मनाई केली आहे इतकंच नाहीतर तो कबुतरांचा वावर परिसरात असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही म्हटले आहे. या मुद्द्यावर दाखल केलेल्या याचिकेवर नुकतीच सुनावणी झाली. दरम्यान, मुंबई, दादर कबुतर खाना अशा ठिकाणी कोणी कबुतरांना दाणे, खाद्य दिल्यास मुंबई महानगरपालिकेला अशा लोकांविरुद्ध थेट एफआयआर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले की, हा मुद्दा सार्वजनिक आरोग्याशी संबंधित असून सर्व वयोगटातील लोकांना आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खायला घालणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, असे निर्देश दिले.

दरम्यान, उच्च न्यायालयाच्या मनाई नंतरही दादरच्या कबूतरखान्यात पक्ष्यांना खाद्य घातलं जात असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयाने यासंदर्भात तीव्र संताप व्यक्त करत याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिकेला दिले होते. यासंदर्भात मुंबईत पहिला गुन्हा दाखल झालाय. माहिमच्या एल जे रोडवर कबुतरांना खाद्य घातल्याचा आरोप करत माहिम पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Published on: Aug 02, 2025 12:19 PM