हिजाब प्रकरणावरुन बेळगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

हिजाब प्रकरणावरुन बेळगावमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला

| Edited By: | Updated on: Mar 15, 2022 | 5:18 PM

मुस्लीम बहूल भागातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये, आणि घडला तरी त्यासाठी बेळगावमधील पोलीस समर्थपणे तो प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. बोर्लिंगय्या यांनी सांगितले.

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावर उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता बेळगावमध्ये कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बेळगाव शहरातील संवेदनशील भागात पोलीस गस्त घालत असून शहर परिसरात आणि बेळगाव शहराजवल कोणताही अनुचतित प्रकार घ़डू नये म्हणून पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मुस्लीम बहूल भागातही मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून कुठेही अनुचित प्रकार घडू नये, आणि घडला तरी त्यासाठी बेळगावमधील पोलीस समर्थपणे तो प्रश्न हाताळण्यासाठी सज्ज असल्याचे पोलीस आयुक्त डॉ. बोर्लिंगय्या यांनी सांगितले. त्यांनी यावेळी नागरिकांना शांततेचेही आवाहन केले आहे.