Ajit Pawar NCP Video : आधी मारहाण अन् आता दहशत, राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकावर कारवाई होणार? पुन्हा व्हिडीओ व्हायरल
पुण्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक बाबुराव चांदोरे यांच्याकडून जेष्ठ नागरिकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल घडल्यानंतर आणखी एक व्हिडीओ आज समोर आलाय.
पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाची माजी नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष बाबुराव चांदेरे यांचा अजून एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये बाबुराव चांदेरे हे खाऊ गल्लीत कामगारांसह स्थानिकांना दमदाटी करताना दिसताय. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. तर काल बाबुराव चांदरे यांनी काल एका नागरिकाला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यानंतर आता नवीन दुसरा व्हिडिओ सोशल माध्यमातून व्हायरल होतोय. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र बाबुराव चांदेरे यांच्या विरोधात पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय. चांदेरे यांनी काल विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केली होती. हा सगळा प्रकार व्हिडीओमध्ये कैद करण्यात आला होता.जमिनीच्या वादातून चांदेरे यांनी विजय रौंदळ यांना चापट मारत उचलून आदळले असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतंय. या मारहाणीत विजय रौधळ यांच्या डोक्याला आणि गुडघ्याला जखम झाली होती. इतकंच नाहीतर काही महिन्यांपूर्वी चांदेरे यांनी अशाच पद्धतीने रिक्षा चालकाला मारहाण केली होती. त्यामुळे त्यांच्यावर आता कोणती कारवाई होते याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.
