Sheikh Hasina : शेख हसीना यांना दुसरा मोठा धक्का, फाशीच्या शिक्षेनंतर आता 21 वर्षांचा तुरूंगवास! प्रकरण नेमकं काय?
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना कथित तीन भ्रष्टाचार प्रकरणात 21 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. फाशीच्या शिक्षेनंतर मिळालेला हा त्यांना दुसरा मोठा धक्का मानला जात आहे.
ढाका येथील न्यायालयाने आज बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना तीन गंभीर कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांवर मोठा धक्का दिला. न्यायालयाने त्यांना या प्रत्येक भ्रष्टाचार प्रकरणात सात वर्षांची शिक्षा सुनावली, एकूण २१ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना यापूर्वीच मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. या निर्णयानंतर एक मोठी समस्या म्हणजे शेख हसीना बांगलादेशात नाहीत; त्या एका वर्षापेक्षा जास्त काळ भारतात राहत आहेत. त्यामुळे, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून असे सांगण्यात आले की, भारत सरकार सध्या बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीची तपासणी करत आहे.
Published on: Nov 27, 2025 05:30 PM
