VIDEO : Anil Deshmukh | माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? अनिल देशमुख यांचा सवाल

VIDEO : Anil Deshmukh | माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? अनिल देशमुख यांचा सवाल

| Edited By: | Updated on: Nov 01, 2021 | 2:00 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत आपली बाजू मांडली. मात्र, ही बाजू मांडताना त्यांनी थेट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख आज अखेर ईडीच्या कार्यालयात हजर झाले. ईडीसमोर हजर होण्यापूर्वी त्यांनी एक व्हिडीओ ट्विट करत आपली बाजू मांडली. मात्र, ही बाजू मांडताना त्यांनी थेट मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला. माझ्यावर आरोप करणारे परमबीर सिंग नेमके आहेत कुठे? असा सवालच अनिल देशमुख यांनी केला आहे. अनिल देशमुख यांनी आज दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. त्यात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले ते सिंग आज कुठे आहेत? ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार परमबीर सिंग भारत सोडून पळून गेले असल्याचं समजत आहे.