BJP : मुख्यमंत्री जीव तोडून बोलताय अन् कुणी ढाराढूर तर कुणी फोनवर… माजी खासदाराला डुलकी लागल्याचा VIDEO व्हायरल

BJP : मुख्यमंत्री जीव तोडून बोलताय अन् कुणी ढाराढूर तर कुणी फोनवर… माजी खासदाराला डुलकी लागल्याचा VIDEO व्हायरल

| Updated on: Jul 29, 2025 | 1:14 PM

भारतीय जनता पक्षाकडून विदर्भस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत असताना माजी खासदार ढाराढूर झोपल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ...

भारतीय जनता पक्षाच्या वर्ध्यातील मेळाव्यात अशोक नेते यांचा डोळा लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरू होतं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी माजी खासदारांना मंचावरच डुलकी लागल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वर्ध्यातील मेळाव्यात अशोक नेते यांचा डोळा लागल्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. वर्धा येथे सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या महामंथन मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळचा हा व्हिडीओ आहे. ‘एकत्रित बसलं पाहिजे. वाद संपवले पाहिजे, अनेक राजकीय पक्षाचं पतन यामुळेच झालं की एकानं दुसऱ्याला ओढलं आणि दुसऱ्याने पहिल्याला ओढलं…आणि दोघांनी मिळून पक्षाला खड्ड्यात घातलं’, असं देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना दिसताय.

भाजपच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात मुख्यमंत्री फडणवीस व त्यांचे विश्वासू मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अशोक उईके, आकाश फुंडकर तसेच डॉ. पंकज भोयर हजर होते. तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे पूर्व नियोजित दिल्ली दौऱ्यामुळे गैरहजर होते. मात्र विदर्भात भाजपचे नेते म्हणून परिचित असलेले सुधीर मूनगंटीवार यांनी दांडी मारल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jul 29, 2025 01:13 PM