Special Report | तेरी मिट्टी में मिल जांवा….CDS जनरल बिपीन रावत अनंतात विलीन

| Updated on: Dec 10, 2021 | 9:53 PM

रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला.

Follow us on

YouTube video player

नवी दिल्ली: ‘अमर रहे… अमर रहे…  जनरल अमर रहे’, ‘वंदे मातरम…’ ‘भारत माता की जय…’ ‘जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा…’ ‘बिपीनजी अमर रहे …. अमर रहे, अमर रहे….’च्या घोषणा देत आज देशाच्या अस्सल हिरोला दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावरही याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. जनरल बिपीन रावत यांच्या पार्थिवाला त्यांच्या कन्येने मुखाग्नी दिला अन् देशाचा श्वास थांबला… हजारो डोळ्यांतून अश्रू ओघळले… एका पर्वाचा अस्त झाला. आज सायंकाळी 5च्या सुमारास बिपीन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. रावत यांची अंत्ययात्रा स्मशानभूमीत आल्यावर त्यांना 17 तोफांची सलामी देऊन गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यानंतर मंत्रोच्चारात लष्करी इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. कृतिका आणि तारिणी यांनी रावत आणि मधुलिका रावत यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देताच अनेकांना अश्रू अनावर झाले होते.