Gajanan Kirtikar : अडीच वर्षात शिंदेंनी मला काय दिलं? शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर, कीर्तिकर नाराज?

Gajanan Kirtikar : अडीच वर्षात शिंदेंनी मला काय दिलं? शिंदे गटातील धुसफूस चव्हाट्यावर, कीर्तिकर नाराज?

| Updated on: Jun 07, 2025 | 3:37 PM

'मिठाचा खोडा अदृश्य शक्ती टाकत आहेत. मी त्यांचं नाव घेत नाही. शिवसेना एकसंघ व्हावी, म्हणजे भविष्यात आपल्याला धोका आहे. हा धोका ज्यांना वाटतो ते मिठाचा खडा टाकतात. मी त्यांचं नाव घेत नाही आता. अदृश्य आहे. मी आज नाव घेत नाही. अदृश्य शक्ती आहे. त्यांचे मनसुबे आहेत.'

सध्या राजकीय वर्तुळात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण येत असल्याचे पाहायला मिळतंय. अशातच ठाकरे बंधू जर एकत्र आलेत तर एकनाथ शिंदे की ठाकरे बंधू कोणासोबत राहणार? असा सवाल शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर यांना केला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

‘मी आता राजकीय फायद्यासाठी मी कुठे जाणार नाही. एकदा मी ठरवलं. एका विशिष्ट कारणासाठी… मला कोणतंही अमिष नव्हतं. अडीच वर्षात एकनाथ शिंदेंनी मला काय दिलं? कोणतं पद दिलं? कोणते अधिकार दिले. तरी पण मी सोडलं नाही. मी एकदा ठरवल्यावर मी दलबदलू करत नाही. ती वृत्ती नाही. मी एकनाथ शिंदेंसोबत राहणार. माझा वापर कसा करावा हे त्यांनी ठरवावं’, असं कीर्तिकर म्हणाले. पुढे ते असेही म्हणाले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना तळमळीनं सांगेल एकत्र या. तुम्ही दोघे तरी एकत्र या. भविष्यात एकनाथ शिंदे यांना सोबत आणण्याचा प्रयत्न करेल. ऐकणं न ऐकणं हे त्यांचं काम आहे. मी ज्येष्ठ आहे. त्यामुळे त्यांना मी बोलू शकतो, असा सल्लाच त्यांनी ठाकरे बंधूंना दिला.

Published on: Jun 07, 2025 03:37 PM