Lalbaugcha Raja : पुढच्या वर्षी लवकर या… तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप

Lalbaugcha Raja : पुढच्या वर्षी लवकर या… तब्बल 22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाला जड अंतःकरणाने निरोप

| Updated on: Sep 29, 2023 | 10:20 AM

VIDEO | मुंबईतील शान आणि प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राज्याला तब्बल २२ तास सुरू असेलेल्या मिरवणुकीनंतर जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला.लालबागच्या राजाला मुंबईकरांकडून गिरगाव चौपाटीवर सकाळी ९ वाजेच्यादरम्यान अखेरचा निरोप देण्यात आला. बघा बाप्पाचं कसं झालं विसर्जन

मुंबई, २९ सप्टेंबर २०२३ | मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम गेल्या दहा दिवसांपासून होती. भक्तीभावाने आणि मनोभावे पूजा-अर्चना करून भाविकांना आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला. मुंबईतील शान आणि प्रसिद्ध असणाऱ्या लालबागच्या राज्याला तब्बल २२ तास सुरू असेलेल्या मिरवणुकीनंतर जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. लालबागच्या राज्याचे गिरगाव चौपाटीवर आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास विसर्जन झाले. गेली दहा दिवस राजाची पूजा आणि सेवा केल्यानंतर लालबागच्या राजाला भाविकांकडून निरोप देण्यात आला. काल सकाळी १० वाजता हा बाप्पा मंडळातून विसर्जनाकरता बाहेर पडला. ढोलताशांच्या नादात आणि पुष्पवृष्टीसह गुलालाची उधळण बाप्पावर करत हा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाला होता. यावेळी हजारोंच्या संख्येने तरूणांसह सर्वच वयोगाटील भाविकांना अखेरचा निरोप देण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Sep 29, 2023 10:10 AM