Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कारचं CCTV समोर अन् चंद्रकांतदादांच्या व्हायरल फोनमुळे राजकारण तापलं

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कारचं CCTV समोर अन् चंद्रकांतदादांच्या व्हायरल फोनमुळे राजकारण तापलं

| Updated on: Oct 06, 2025 | 10:53 AM

गौतमी पाटीलच्या गाडीमुळे झालेल्या अपघातानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांनी डीसीपीला फोन केल्याने विरोधकांनी निशाणा साधला. अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, गौतमीचा चालक संतोष उभे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोप अजूनही सुरू आहेत.

पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर रोजी गौतमी पाटीलच्या गाडीने एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात रिक्षाचालक समाजी मरकळे गंभीर जखमी झाले. अपघाताच्या वेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, तरीही मंत्री चंद्रकांत पाटलांनी थेट डीसीपीला फोन करून गौतमीला उचलायचं की नाही असा सवाल केला. यावरून रोहित पवारांसह विरोधकांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला. या घटनेचे अपघातापूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात गाडी पेट्रोल पंपाजवळ थांबलेली दिसते आणि त्यातून दोन व्यक्ती उतरताना दिसतात. अपघातानंतर गौतमीचा चालक संतोष उभे याला पोलिसांनी अटक केली. ससून रुग्णालयाच्या अहवालानुसार, चालकाने मद्यपान केले नव्हते. या अपघातानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

Published on: Oct 06, 2025 10:53 AM