Gautami Patil : मंत्र्यांची फोनाफोनी अन् गौतमी पाटीलची बदनामी, पत्रकार परिषद घेत म्हणाली…म्हणून माझी बदनामी होतेय
गौतमी पाटीलने पुण्यात तिच्या गाडीला झालेल्या अपघातात स्वतःची बदनामी होत असल्याचा आरोप केला आहे. ती गाडीत नसतानाही केवळ तिच्या नावावर गाडी असल्याने तिला दोषी ठरवले जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पोलिसांना केलेल्या फोनमुळे हे प्रकरण अधिक चिघळले असून, यामुळे तिच्याविरोधात मोर्चे निघत आहेत.
पुण्यातील एका रिक्षाला झालेल्या धडकेच्या अपघात प्रकरणी नृत्यांगना गौतमी पाटीलने आपली बाजू मांडली आहे. अपघात झाला त्यावेळी गौतमी पाटील गाडीत नव्हती, असे पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्ट केले आहे. मात्र, केवळ गाडी तिच्या नावावर असल्याने आपली नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप तिने पत्रकार परिषदेत केला.
या प्रकरणात राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून गौतमी पाटीलवर कारवाई करण्याची घाई केली, त्यामुळे हे प्रकरण अधिक तापले. मंत्री पाटील यांनी माहिती न घेता केलेल्या हस्तक्षेपामुळे गौतमी पाटीलविरोधात आंदोलने सुरू झाली आहेत. “मी गुन्हेगार नाहीये, मग मला का दोषी ठरवले जात आहे?” असा सवाल गौतमी पाटीलने विचारला आहे. तिचा गाडीचालक अपघातास कारणीभूत असताना, तिला लक्ष्य केले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे.
Published on: Oct 09, 2025 11:27 AM
