‘राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत, काहीही बरळतात’; भाजपच्या बड्या मंत्र्याची जिव्हारी लागणारी टीका

‘राऊत सध्या जोकरच्या भूमिकेत, काहीही बरळतात’; भाजपच्या बड्या मंत्र्याची जिव्हारी लागणारी टीका

| Updated on: Feb 16, 2025 | 4:20 PM

ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून संजय राऊत यांनी भाष्य करताना भाजपवर टीकास्त्र डागलंय

फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर बोलताना केला. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. यावरून संजय राऊत यांनी भाष्य करताना भाजपवर टीकास्त्र डागलंय. संजय राऊत यांच्या टीकेवर भाजपचे नेते मंत्री गिरीश महाजन यांना सवाल केला. यावेळी प्रतिक्रिया देताना गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. ‘काय बोलावं आता या माणसाबद्दल मुंगिरी लाल की हसीन सपने याप्रमाणे हा माणूस बोलतो आहे. शेखचिल्ली सारखे प्रकार त्यांचे चालले आहे. वाटेल ते बरळायचं…’, असं म्हणत गिरीश महाजन यांनी जोरदार घणाघात केला. तर जोकरच्या भूमिकेमध्ये सध्या संजय राऊत आहेत. सकाळपासून ते काहीही बडबडता आहेत…., असं म्हणत खोचक टीका गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर केल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Feb 16, 2025 04:20 PM