Arun Dongale : ‘गोकुळ’च्या आघाडीत बिघाडी? अध्यक्ष अरुण डोंगळे बंडाच्या तयारीत
Gokul Dairy Union Crisis : गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे बंडाच्या तयारीत असल्याने मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे.
गोकुळ दूध संघात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलेला आहे. कारण गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे हे बंडाच्या तयारीत आहेत. तर अरुण डोंगळे यांची अध्यक्षपदाची 2 वर्षांची टर्म संपलेली असल्याने अध्यक्ष बदलाच्या हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता डोंगळे यांनी हे बंडाचं हत्यार उपसलेलं आहे. गेल्या चार वर्षांपासून गोकुळमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व आहे. आता मात्र डोंगळे यांनी बंडाचा पवित्रा घेतल्यामुळे गोकुळमध्ये महायुतीची सत्ता येण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कालावधी असतानाच सत्ताधारी आघाडीमध्ये आत्तापासूनच बिघाडीला सुरुवात झाली आहे.
Published on: May 15, 2025 02:05 PM
