Ladki Bahin Yojana  : लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी, रक्षाबंधन यंदा जोरात… जुलै-ऑगस्टचे 1500 रूपये कधी खात्यात जमा?

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो आनंदाची बातमी, रक्षाबंधन यंदा जोरात… जुलै-ऑगस्टचे 1500 रूपये कधी खात्यात जमा?

| Updated on: Jul 31, 2025 | 9:53 AM

जुलै महिना संपत आला तरी या महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप जमा झालेले दिसत नाहीत. त्यामुळे रक्षाबंधन तोंडावर असताना जुलै हफ्ता अद्याप मिळाला नसल्याने महिला वर्गात नाराजी आहे. दरम्यान, यासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे.

जुलै महिना संपत आला तर अद्याप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात या महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही. त्यामुळे जुलैचा हफ्ता येणार की नाही? अशी चर्चा महिलांमध्ये सुरू झाली आहे. अशातच राज्यातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्र पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जुलै आणि ऑगस्ट अशा दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रूपये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींची रक्षाबंधन यंदाही आनंदात साजरी होणार असल्याचे दिसंतय.

अशातच लाडकी बहीण योजनेमधील २६ लाख अर्जांची पडताळणी करून सरकार त्यावर योग्य ती कारवाई करणार आहे. म्हणजेच ज्यांनी चुकीची माहिती दिली असेल किंवा काही तांत्रिक अडचणी आल्या असतील असे २६ लाख अर्ज सरकार तपासणार आहे. मात्र तसं असेल तर निवडणुकांच्या तोंडावर इतके लाखो अर्ज मंजूर कसे झाले? त्यावर सरकार काहीही बोलत नाही असं म्हणत विरोधकांनी सरकारला घेरलंय.

Published on: Jul 31, 2025 09:53 AM