वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका..; गोट्या गित्तेचा खळबळजनक व्हिडीओ

वाल्मिक कराड माझं दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करू नका..; गोट्या गित्तेचा खळबळजनक व्हिडीओ

| Updated on: Aug 03, 2025 | 10:50 AM

मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गित्ते याने आमदार जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे.

फरार आरोपी गोट्या गित्ते याने नेते जितेंद्र आव्हाड यांना धमकी दिली आहे. जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचे नाहीत. आव्हाडांना महागात पडणार असं गित्ते याने म्हंटलं आहे. मकोका आणि महादेव मुंडे हत्या प्रकरणातील संशयित फरार आरोपी असलेल्या गोट्या गित्ते याने याबाबत एक व्हिडीओ व्हायरल केला आहे.

या व्हिडीओमध्ये गित्ते याने म्हंटलं आहे की, माझे वाल्मिक कराड यांच्याशी संबंध असल्याची चर्चा होत आहे. मी त्यांचा कार्यकर्ता आहे, पण त्यापलीकडे माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. तरीही आमदार जितेंद्र आव्हाड, खासदार बजरंग सोनावणे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. “कोणाचीही मुलगी उचलून नेली जाते,” असे बिनबुडाचे दावे केले जात आहेत. मी वंजारी समाजाचा असलो तरी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळे मला लाज वाटते. त्यांनी माझ्यावर मंदिराचा मुखवटा चोरल्याचा आरोप केला आहे. तसेच, दरोडे, खून आणि खंडणी असे खोटे आणि निराधार आरोप माझ्यावर लादले जात आहेत. मी सर्वांना विनंती करतो की, असे बिनबुडाचे आरोप करू नका. जितेंद्र आव्हाड हे वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत, असेही मी स्पष्ट करतो, अशा आशयाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Published on: Aug 03, 2025 10:50 AM