GST Rate Cuts : दिवाळीत मोदी सरकारचा स्वस्ताईचा धमाका, GST टॅक्स रद्द करण्यास मंजुरी, बघा रोजच्या वस्तूंमध्ये काय होणार स्वस्त?

GST Rate Cuts : दिवाळीत मोदी सरकारचा स्वस्ताईचा धमाका, GST टॅक्स रद्द करण्यास मंजुरी, बघा रोजच्या वस्तूंमध्ये काय होणार स्वस्त?

| Updated on: Aug 21, 2025 | 9:55 PM

रोजच्या वापराच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. 12 टक्के आणि 28 टक्के जीएसटी टॅक्स रद्द करण्यावर आता मंजुरी मिळाली. दिवाळीत मोदी सरकार सर्वसामान्यांसाठी आता मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे.

जीएसटी कौन्सिलच्या मंत्रीगटाने 12 टक्क्यांचा टॅक्स पाच टक्क्यांवर आणण्यावर आणि 28 टक्क्यांचा टॅक्स 18 टक्के आणण्यावर मंजुरी दिली. त्यामुळे आता 12 टक्के आणि 28 टक्क्यांचा टॅक्स लॅब हा रद्द होणार आहे. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकेत दिल्यानंतर दिवाळीमध्ये स्वस्ताईचा धमाका करण्याच्या हालचाली मोदी सरकारने सुरू केल्या आहेत. या निर्णयामुळे रोजच्या वापरातील अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत.

काय काय स्वस्त होणार

साबण, टूथपेस्ट, हेअर ऑइल, औषध, अँटीबायोटिक्स, पेनकिलर, सुकामेवा, स्नॅक्स, प्रोसेस केलेल्या खाण्याच्या वस्तू, प्रोसेस केलेला भाजीपाला, काही मोबाईल, काही कम्प्युटर्स, शिलाई मशीन, प्रेशर कुकर, गिझर, पाण्याचे फिल्टर, इलेक्ट्रिक आयर्न, व्हॅक्यूम क्लिनर, महाग कपडे, कमी दरातले शूज, व्हॅक्सिन, सायकल, भांडे, मोठी वाहनं, कृषी हत्यारं.

28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर काय येणार?

सिमेंट, सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, प्रिंटर, एसी, फ्रिज, टीव्ही, वॉशिंग मशीन, रबर टायर, डिशवॉशर, प्रोटीन आणि अल्युमिनियम फॉइल.

टॅक्सच्या शिफारशी जीएसटी कौन्सिलच्या पुढच्या बैठकीमध्ये ठेवल्या जातील. केंद्र राज्य सरकारची यावर सहमती झाल्यावर जीएसटी कौन्सिल हे दर लागू करण्यासाठी तारीख ठरवेल. हे दर दिवाळीच्या वेळी लागू व्हावेत यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.

Published on: Aug 21, 2025 09:55 PM