Ahmedabad Plane Crash : लकी नंबरच्या तारखेलाच मृत्यूनं कवटाळलं, विजय रूपाणींच्या 1206 अंकाचा योगायोग काय?
गुजरातच्या माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा सुद्धा या विमान दुर्घटनेमध्ये मृत्यू झाला आहे. विजय रूपाणींसाठी लकी असलेला आकडाच दुर्दैवी निघाला आहे. विजय रूपाणी 1206 हा आकडा लकी मानत होते. मात्र 1206 म्हणजेच 12 जूनला विमान अपघातात त्यांचे निधन झाले आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी यांचा मृत्यू झाला आहे. 1206 म्हणजेच 12 जूनला विजय रूपाणी यांनी अहमदाबादहून लंडनला जाणार्या विमानाचे तिकीट बुक केले होते. विजय रूपाणी यांनी विमानातली सीट सुद्धा 12 नंबरचीच बुक केली होती. विजय रूपाणी यांनी बोर्डिंगसाठी 12 वाजून 6 मिनिटांचीच वेळ निवडली होती. 12 वाजून 10 मिनिटांनी त्यांचे बोर्डिंग पार पडले होते. 1206 हा आपल्यासाठी लकी नंबर असल्याचे विजय रूपाणी मानत होते. विजय रूपाणी यांनी सर्वात पहिल्यांदा खरेदी केलेल्या स्कूटरचा नंबर सुद्धा 1206 हाच होता. त्यानंतर रूपाणी यांनी जेवढ्या गाड्या घेतल्या त्या सर्व गाड्यांचे नंबर्स 1206 असेच होते. अखेर गुरूवारी 1206 म्हणजेच 12 जूनला रूपाणी असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातात विजय रूपाणी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जो आकडा विजय रूपाणी आपल्यासाठी लकी मानत होते तोच आकडा त्यांच्यासाठी दुर्दैवी ठरला आहे.
