Gujarat : …अन् बघता क्षणी आनंद-वडोदऱ्याला जोडणारा पूल कोसळला, 10 जणांचा मृत्यू; बघा थरारक VIDEO

Gujarat : …अन् बघता क्षणी आनंद-वडोदऱ्याला जोडणारा पूल कोसळला, 10 जणांचा मृत्यू; बघा थरारक VIDEO

| Updated on: Jul 09, 2025 | 1:32 PM

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. गुजरातमधील आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभिरा पूल कोसळला आहे. या भीषण दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

गुजरातमधील आनंद आणि वडोदरा जिल्ह्याला जोडणारा गंभिरा पूल कोसळल्याची माहिती आज समोर आली. या भीषण दुर्घटनेत पूल कोसळळ्याने दोन ट्रक आणि एका बोलेरोसह चार वाहनं नदीत कोसळली. तर या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला तर कित्येक जण गंभीर जखमी माहिती मिळतेय. महिसागर या नदीवर असलेला हा पूल ४३ वर्ष जुना आहे. हा पूल मध्य गुजरात आणि सौराष्ट्रला जोडतो. या घटनेनंतर नदीपात्रात कोसळलेल्या वाहनांमधील काही जणांना वाचवण्यात यश आल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, पूल मधोमधच ब्रेक झाल्याने  वडोदरा आणि आनंद या जिल्ह्यामधील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.

Published on: Jul 09, 2025 01:32 PM