सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले गुलाबराव पाटीलांचा हल्लाबोल
सायकल चोरणारे नारायण राणे मुख्यमंत्री झाले असा हल्लाबोल गुलाबराव पाटीलांनी सोलापूर येथे केला
मुंबई : शिवसेना असं रसायन आहे की, ज्यामुळे अगदी सामान्य लोकही आमदार, खासदार आणि मंत्री झाले. अगदी सायकल चोरणारे नारायण राणे यांनाही मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान मिळाला, असे वक्तव्य शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले. ते सोलापूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटले की, शिवसेनेमुळे टोपली फिरवणारे चंद्रकांत खैरे खासदार झाले, मुरारी वाजवणारे विजयराज शिंदे आमदार झाले, रिक्षा चालवणारे दिलीप भोळे आमदार झाले, पानटपरी चालवणार गुलाबराव पाटील तुमच्यासमोर मंत्री म्हणून उभा आहे. हे सोडा, पण सायकल चोरणारे नारायण राणेही शिवसेनेमुळे मुख्यमंत्री झाले, असे गुलाबराव पाटील यांनी यांनी म्हटले. त्यामुळे आता नारायण राणे या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
