Gunaratna Sadavarte Video : ‘अंजली दमानिया यांचं पितळ उघडं पडलं, हे ढोंग…’, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

Gunaratna Sadavarte Video : ‘अंजली दमानिया यांचं पितळ उघडं पडलं, हे ढोंग…’, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल

| Updated on: Feb 17, 2025 | 5:01 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. यावर गुणरत्न सदावर्ते यांनी पलटवार केलाय.

मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सातत्याने आक्रमक भूमिका घेणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पुन्हा धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. मंत्री धनंजय मुंडेंनी कृषी घोटाळा केल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता. नुसते आरोप नव्हते त्याचे पुरावे देखील त्यांनी दिले होते. यावरून त्यांनी आज माध्यमांसमोर असे म्हटले की, प्रत्येक गोष्ट ही ऑनलाईन वेबसाईटवर विकत मिळतेय. याचे सर्व पुरावे ज्यावेळी मी दाखवले होते. त्यानंतर मला वाटले की, हे सर्व शेतीचे उत्पादनं आपण विकत घ्यावे. त्यासाठी ऑनलाईन वेबसाईटवर ऑर्डर केली पण माझी ऑर्डर माझ्यापर्यंत पोहोचली नाही. मला सांगितले की, कंपनीने हे आता थांबवले आहे. आता मी हे खात्रीने सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा घोटाळा आहे, असे म्हणत दमानियांनी पुन्हा मुंडेंवर आगपाखड केली. दरम्यान, यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भाष्य केले. ‘अंजली दमानिया यांनी पत्रकारांसमोर आज खेळ मांडला. केंद्र सरकारच्या शेतीविषयक उत्पादनासंबंधित जे खातं आहे त्यांनी शेतीविषयक उत्पादनांना ऑनलाईन विक्रीला बंदी घातली आहे. कोणतीही कंपनी ते ऑनलाईन विक्री करू शकत नाही. आज पत्रकार परिषदेत त्यांनी जे नाटक केलं ते त्यांचं ढोंग उघडं पडलं आहे’, असं म्हणत गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानियांवर चांगलाच हल्लाबोल केला. बघा काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?

Published on: Feb 17, 2025 04:53 PM