Gunratna Sadavarte : माझ्या बंजारा भावांना… ST आरक्षण, बंजारांच्या ‘त्या’ मागणीला सदावर्तेंचा पाठींबा
बंजारा समाजाकडून एसटी आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला गुणरत्न सदावर्ते यांनी पाठींबा दिला आहे. हैद्राबाद गॅझेटचा आधार घेऊन ही मागणी केली जात आहे. बघा काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते?
बंजारा समाज एसटी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे. हैद्राबाद गॅझेटच्या आधारे हे आरक्षण मिळावे अशी बंजारा समाजाची मागणी आहे. या मागणीला गुणरत्न सदावर्ते यांनी पाठींबा दिला आहे. पुसद येथे त्यांनी बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांशी आणि आंदोलकांची भेट घेतली आणि एसटी आरक्षण मिळेल असा दावा केला. सदावर्ते यांच्या या दाव्यामुळे राजकीय चर्चा रंगली आहे. काही तज्ज्ञांनी या गॅझेटच्या आधारे आरक्षण देण्याबाबत शंका व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याने देखील चर्चा निर्माण झाली आहे. त्यांनी गरजूंनाच आरक्षण मिळावे असे मत व्यक्त केले आहे.
Published on: Sep 23, 2025 10:58 AM
