Viral Trend : पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड तुम्ही करताय? जरा थांबा… त्यामागचं वैज्ञानिक कारण माहितीये का?

Viral Trend : पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड तुम्ही करताय? जरा थांबा… त्यामागचं वैज्ञानिक कारण माहितीये का?

| Updated on: Jun 26, 2025 | 12:34 PM

Light Haldi Trend Viral - गेल्या काही दिवसापासून एक ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे. मोबाईलची बॅटरी लावून त्यावर काचेचा पाण्याने भरलेला ग्लास ठेवून पाण्यात कोरडी हळद टाकली जाते त्यानंतर पाण्यात आकर्षक असं सुंदर दृश्य तयार होतं. इंस्टाग्रामवर सध्या हळदीच्या विविध रंगछटाचे प्रयोग ट्रेंडिंग होत आहेत.

नांदेड प्रतिनिधी, योगेश लोंढे

सोशल मीडियाच्या जगात कोणता ट्रेंड कधी त्याची हवा करेल हे कोणीच सांगू शकत नाही. असाच एक ट्रेंड सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे आणि लोकं झपाटल्यावाणी त्या ट्रेंडनुसार जोरदार व्हिडिओ बनवत आहेत आणि ते सोशल मीडियावर अपलोड करत आहेत. हा ट्रेंड सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अरुण कुमार व्यास नावाच्या ज्योतिषानं असं म्हटलं की, असे केल्याने तुम्ही केवळ नकारात्मक ऊर्जाच तुमच्या घरात आणत नाही आहात तर ही क्रिया केल्याने भूत-प्रेतांना आमंत्रण दिल्या सारखे आहे. मात्र या सगळ्यात आता त्याचं वैज्ञानिक कारण समोर आलं आहे.

नांदेड येथील यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर मदन अंभोरे यांनी ती कारणं स्पष्ट केली आहेत. अशा प्रयोगांमुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत विज्ञानाविषयीची जागरुकता, रूची वाढत असल्याचे दिसून येते असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘हळदीत कर्क्युमिन घटक असतो त्यावर प्रकाश पडला की तो प्रकाश प्रवर्तित करतो, त्यामध्ये औषधी गुणधर्म सुद्धा असतात. कर्क्युमिन घटकाच पाण्यात विरघळण्याचे प्रमाण कमी आहे. अल्कोहोल मध्ये मिथेनाईल द्रवणामध्ये कोरडी हळद टाकून हा प्रयोग केला तर जास्त प्रकाशित होतो. ‘, असं त्यांनी सांगितले.

Published on: Jun 26, 2025 12:34 PM