Hasan Mushrif | 15 ऑगस्टला होणाऱ्या ग्रामसभा यंदाही रद्द, मंत्री हसन मुश्रीफ यांचे आदेश
ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ऐच्छिक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात 15 ऑगस्टला गावोगाव होणाऱ्या ग्रामसभा यंदा होणार का, असा सवाल प्रत्येक नागरिकाला पडला होता. कारण, मागील वर्षा 15 ऑगस्टची ग्रामसभा रद्द करण्यात आली होती. याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी मोठी घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्य दिनी राज्यभर होणाऱ्या ग्रामसभा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही रद्द करण्यात आल्या आहेत. ज्यांना ग्रामसभा घ्यायची असेल त्यांनी ऑनलाइन पद्धतीने घ्यावी असं आवाहन मुश्रीफ यांनी केलंय. त्यामुळे 15 ऑगस्ट रोजी होणारी ग्रामसभा ऐच्छिक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
