Somaiya-Raut वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, Hasan Mushrif यांचा कुणाला टोला?

Somaiya-Raut वादावर बोलणार नाही, मी लहान कार्यकर्ता, Hasan Mushrif यांचा कुणाला टोला?

| Edited By: | Updated on: Feb 19, 2022 | 9:57 PM

सुरूवातील सोमय्या यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला संजय राऊतांनी बहुचर्चित पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले. त्यानंतर सोमय्यांनी कोर्लईपासून ते पुण्यापर्यंत सर्व पिंजून काढलं. या वादाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता, त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत टोलेबाजी केली आहे.

पुणे : राज्यात सध्या किरीट सोमय्या (Kirit Somaiyya) विरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) या वादाचा एपिसोड सध्या चांगलाच गाजत आहे. या वादावर महाविकास आघाडी आणि भाजपकडून एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहेत. हा कुठेतरी थांबला पाहिजे अशा प्रतिक्रियाही येत आहे. सुरूवातील सोमय्या यांनी संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्याला संजय राऊतांनी बहुचर्चित पत्रकार परिषद घेत जोरदार उत्तर दिले. त्यानंतर सोमय्यांनी कोर्लईपासून ते पुण्यापर्यंत सर्व पिंजून काढलं. या वादाबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांना विचारले असता, त्यांनी मात्र सावध पवित्रा घेत टोलेबाजी केली आहे. यावर मी बोलणार नाही, मी एक छोटा कार्यकर्ता आहे. असा टोला मुश्रीपांना लगावला आहे. मग हा टोला सोमय्यांना आहे? की संजय राऊतांना? हे मात्र कळायला मार्ग नाही. दोन्ही बाजुंनी जहरी वाक्यांचे बाण सुटत असताना मुश्रीफांचं हे अबोलपण आता चर्चेत आलंय.