10 च्या 10 हेडलाईन्स | 10 PM 10 Headlines | 10 PM | 07 April 2022

| Updated on: Apr 07, 2022 | 11:32 PM

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा दावा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. देशमुख यांनी मनमानी बदल्या आणि पोस्टिंगसाठी पोलिस अधिकार्‍यांवर अवाजवी प्रभाव टाकल्याचा आरोपही ईडीने केलाय.

Follow us on

माजी गृहमंत्री अनिल देशमुख हेच मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील मुख्य सूत्रधार आहेत. पैसा गोळा करण्यासाठी त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला, असा दावा अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात केलाय. देशमुख यांनी मनमानी बदल्या आणि पोस्टिंगसाठी पोलिस अधिकार्‍यांवर अवाजवी प्रभाव टाकल्याचा आरोपही ईडीने केलाय. देशमुख यांच्या जामीन याचिकेला उत्तर म्हणून उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ईडीने या बाबी नमूद केल्या आहेत.

ईडीचे सहायक संचालक तसीन सुलतान यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात अनिल देशमुख यांची याचिका फेटाळण्याची मागणी करण्यात आली आहे. देशमुख हे प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळे तपासावर प्रभाव टाकू शकतात, असं या प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. अर्जदार अनिल देशमुख आणि त्याचा मुलगा हृषिकेश देशमुख, सचिन वाझे, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे हे या संपूर्ण कटाचे सूत्रधार असल्याचं ईडीने म्हटलंय.