VIDEO: देशाचा अर्थसंकल्प आरोग्य व्यवस्थेला चालना देणाराः भारती पवार

| Updated on: Feb 01, 2022 | 6:53 PM

हा अर्थसंकल्प आरोग्य अर्थव्यवस्थेला गती देणारा असून देशाच्या विकासासाठी लाभदायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी व्यक्त केली.

Follow us on

हा अर्थसंकल्प आरोग्य अर्थव्यवस्थेला गती देणारा असून देशाच्या विकासासाठी लाभदायक असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांनी व्यक्त केली.  हा अर्थसंकल्प आधुनिकतेकडे वाटचाल करणारा असून प्रत्येक क्षेत्रासाठी त्या फायदेशीर आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मांडलेला या अर्थसंकल्पात दोन लाख अंगणवाड्या बनविणार आहेत. कोरोनामुळे देशातील अनेक नागरिक मानसिक तणावखाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आणि नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी अर्थसंकल्पात भरीव योगदान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नामुळे भारत आत्मनिर्भर होत चालला असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. आयुष्यमान भारत, डिजिटल भारतसारख्या योजनांमुळे भारत प्रगतीपथावर वाटचाल करत असून त्याचा फायदा भारतातील प्रत्येक नागरिकाला होणार आहे असे आरोग्य मंत्री भारती पवार यांनी सांगितले.